Welcome to M.C.H, Mumbai

Fredrick Samuel Hahnemann
Dr. Harpale Vilas Shamrao
Administrator
Shri Vijay Thanvi
Registrar of M.C.H


जाहीर Dated: 11-03-2022

सूचना Dated: 22-02-2022

जाहीर निवेदन Dated: 10-02-2022

सूचना

सूचना

सूचना

Cancelled Number list

जाहीर निवेदन















International Integrative COVID-19 Patient Management Webinar

















We salute our Master

"Dr. C.F.S.Hahnemann"

265th Birth Anniversary

Wish you all Happy World Homoeopathy Day

मित्रहो,
वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात आधुनिक व परिपूर्ण चिकित्सापद्धती होमिओपॅथीचे जनक डॉ.सॅम्यूएल हनिमॅन यांच्या २६५ व्या जयंतीच्या व त्याचे औचित्य साधून आपण साजरा करीत असलेल्या "जागतिक होमिओपॅथी दिनाच्या" आपणास वैयक्तिक माझ्या तर्फे व महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे सर्व सदस्य आणि कर्मचारिवृंद यांच्यातर्फे कोटी कोटी शुभेच्छा. मित्रहो भारत सरकार च्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र आयुष संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय आपत्तिकाळात पुरेसे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ हाताशी उपलब्ध असावे म्हणून सरकारने आखून दिलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे आखलेल्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमास आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आपले अभिनंदन व आभार. आत्ता या क्षणापर्यंत २५३२८ इतक्या मोठ्या संख्येने प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला आहे हे अभिमानास्पद आहे उर्वरित नोंदणीकृत व्यावसायिकांना सुद्धा त्वरीत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आम्हा सर्वांचे आवाहन आहे. काही नतद्रष्ट व्यक्तींनी या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल नेहमीप्रमाणे सोशल मीडिया वरून अत्यन्त हीन पातळीवरून प्रचार करून दिशाभूल करण्याचा व संभ्रम करण्याच्या केलेल्या प्रयत्नांना दाद न देता आपण आपल्या राष्ट्रीय कर्तव्याप्रति दाखवलेल्या निष्ठे बद्दल आम्हाला आपला अभिमान वाटतो सध्याच्या कोविड19 आपत्ती प्रसंगी उपचार व प्रतिबंध या करिता अत्यंत प्रभावी ठरू शकणाऱ्या होमिओपॅथी चिकित्सा पद्ध्तीने उपचार व संशोधन करण्याची परवानगी मिळावी या करीता केंद्रीय पातळीवर प्रयत्न करणारी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद ही पहिली स्टेट कौन्सिल असून त्याकरिता सीसीआरएच व आयुष मंत्रालय यांचेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यात यश आले परंतु आरोग्य हा राज्य सुचितील विषय असला तरी सध्या साथ नियंत्रण अधिनियम व राष्ट्रीय आपत्ती निवारण अधिनियम देशभर लागू असल्याने या बाबतीतील सर्व मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे अधिकार केंद्रशासनाकडे असून त्याचे पालन करणे राज्य सरकारांना बंधनकारक आहे व केंद्रीय आरोग्य मंत्रालया च्या केवळ WHO च्या प्रोटोकॉल प्रमाणेच उपचार करण्याच्या सूचना असल्याने सीसीआरएच च्या अटीनुसार कोरोना उपचाराकरिता अधिसूचित रुग्णालयाचे अधिष्ठाता व एथिकॅल कमिटी चे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त होत नव्हते, आजच सोशल मीडिया वर मा आयुष मंत्री यांचे व्हायरल झालेल्या गोवा सरकारने दिलेल्या परवानगी संबंधीचे ट्विट अधिकृत असल्या बाबत खातरजमा करून घेऊन जर केंद्रीय आरोग्यखात्याने धोरणात बदल केले असतील तर अशी परवानगी महाराष्ट्रात पण मिळावी या करिता राज्यशासनास खातरजमा करून परवानगी मिळावी या करिता परिषदेमार्फत विनंती करून पाठपुरावा केला जात आहे हे आपल्या माहितीकरिता नमूद करीत आहे. २४×७ आपलाच.

डॉ. नितीन गावडे

अध्यक्ष एम सी एच मुंबई




How to use Personal Protective Kit (PPE) for their safety from COVID-19



SiteLock